पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामीलीला 2 …….!! श्री स्वामी समर्थ !!

इमेज
स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !! तंतुकराचे दारिद्र्य गेले.....             मंगळवेढ्यास एक तंतूकार(साळी) दरिद्री माणूस राहत होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. असाच फिरत असताना एक दिवस सुदैवाने त्याची   आणि स्वामींची भेट घडली. श्री समर्थांच्या कृपे बद्दल त्याला ऐकून माहीत होते. पण प्रत्यक्ष भेटी नंतर तो स्वामीमय झाला. तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला. त्याच्या त्या सेवेला तीन महिने उलटून गेले. श्रींना त्याची दया आली. एके दिवशी रात्री तंतूकाराचे स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितले की,"तुझे वडील पूर्वीमोठे व्यापारी होते पंढरपुरास यात्रेस गेले असताना ते तिकडेच मरण पावले, तुझी आई त्यांच्या अगोदरच मृत्यू पावली. तुझ्या घराच्या समोर तुळशीवृंदावना खाली तुझ्या वडिलांनी पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते तू काढून घे!" असा चमत्कारीक दृष्टांत पाहून तो तंतूकार जागा झाला.              श्रींच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशीवृंदावनाच्या खाली खणल्यावर तंतुकराला भरपूर धन सापडते. तंतुकाराला अत्यानंद होतो आणि तो धावत जाऊन स्वामींना शोधू लागतो, त्याला स्वामी जंगलात ध्य

स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !!

इमेज
     स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !! ➤➤ ब्राह्मणाचा पोटशूळ गेला…..      कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राम्हण पोटशूळच्या आजाराने त्रस्त होता. तो गाणगापूरात गुरु सेवेत असताना एके रात्री दत्तगुरु त्याला दृष्टांत देतात की, "श्रीपुरी च्या पानाचा रस काढून त्यात सुंठ आणि  सैंधव  घालून त्याचे सेवन कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. "श्रीधरला सकाळी जाग आल्यावर स्वप्नाची आठवण झाली. पण श्रीपूरी कोणत्या झाडाला म्हणतात ते त्याला कळेना. काही वैद्य आणि अनुभवी माणसांना त्याने विचारले पण कोणाला काही माहीत नव्हते. श्रीधर ब्राम्हणाला चिंता वाटू लागली. तसाच तो गुरुसेवा आटोपून त्या रात्री देवळात झोपला. रात्री परत स्वप्नात दत्तगुरु यतीरूपात येऊन बोलले की, "अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत. ते तुला श्री पुरीचे झाड दाखवतील."        यती राजांच्या आज्ञेप्रमाणे श्रीधराने सकाळी अक्कलकोट चा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो   अक्कलकोटला जाऊन पोहोचला. त्यावेळेस विहिरीजवळील मारुती मंदिराच्या ओट्यावर स्वामींची स्वारी बसली होती. स्वामींना नमस्कार करून श्रीधर स्वामींच्या समो

स्वामीनिष्ठा ........!! श्री स्वामी समर्थ !!

इमेज
!!  श्री   स्वामी   समर्थ !!               आता पर्यंतच्या लेखात गुरु म्हणजे कोण ? स्वामी समर्थ हे कोणाचे अवतार ? त्यांनी अवतार कार्यास कुठून सुरुवात केली ? स्वामींचे   स्वरूप , वर्णन पाहिले . आता आपण भक्तांच्या रक्षणासाठी त्यांच्या उद्धारासाठी स्वामींनी केलेले चमत्कार आणि लीला पाहू .   स्वामीनिष्ठा .....          श्री स्वामींच्या   सप्तशती   मधील सहाव्या अध्यायात स्वामीनिष्ठेची एक सुंदर कथा मांडली आहे .  रामशास्त्री नावाचा एक निष्ठावान भक्त स्वामींची मनोभावे सेवा करत होता .  एके दिवशी गावातील काही लोक कार्तिक   स्वामींच्या    यात्रेस जात असताना रामशास्त्री ला त्यांच्या सोबत येण्याचा आग्रह करू लागले .  रामशास्त्री मोठ्या नम्रतेने त्यांना नकार देत म्हणाले , की माझा देव माझे स्वामी समर्थ आहेत ते प्रत्यक्ष दत्तगुरु आहेत आणि त्यांची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा आहे त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही .           रामशास्त्री हे खूप मनोभावे स्वामींची सेवा करत  असत, आणि तो  त