स्वामीनिष्ठा ........!! श्री स्वामी समर्थ !!


!! श्री स्वामी समर्थ !!

     
        आता पर्यंतच्या लेखात गुरु म्हणजे कोण? स्वामी समर्थ हे कोणाचे अवतार? त्यांनी अवतार कार्यास कुठून सुरुवात केली? स्वामींचे  स्वरूप ,वर्णन पाहिले. आता आपण भक्तांच्या रक्षणासाठी त्यांच्या उद्धारासाठी स्वामींनी केलेले चमत्कार आणि लीला पाहू.


 स्वामीनिष्ठा.....

         श्री स्वामींच्या सप्तशती मधील सहाव्या अध्यायात स्वामीनिष्ठेची एक सुंदर कथा मांडली आहेरामशास्त्री नावाचा एक निष्ठावान भक्त स्वामींची मनोभावे सेवा करत होताएके दिवशी गावातील काही लोक कार्तिक  स्वामींच्या  यात्रेस जात असताना रामशास्त्री ला त्यांच्या सोबत येण्याचा आग्रह करू लागलेरामशास्त्री मोठ्या नम्रतेने त्यांना नकार देत म्हणाले, की माझा देव माझे स्वामी समर्थ आहेत ते प्रत्यक्ष दत्तगुरु आहेत आणि त्यांची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा आहे त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही

         रामशास्त्री हे खूप मनोभावे स्वामींची सेवा करत असत, आणि तो त्यांचा निस्वार्थ सेवा भाव स्वामीना खूप आवडत असे. म्हणूनच स्वामी समर्थांनी रामशास्त्री साठी कार्तिक पौर्णिमेला एक चमत्कार घडवला. नेहमीप्रमाणे रामशास्त्री स्वामी सेवेत मग्न असताना अचानक स्वामीं भोवती लख्ख प्रकाश पडला आणि स्वामींनी कार्तिक स्वामींचे रूप घेतले. हा सगळा चमत्कार पाहून रामशास्त्री चा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनाते खूप गोंधळले. पण क्षणात स्वामींची लीला लक्षात आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना. ते भक्तिभावाने नाचू लागलेत्यांची स्वामीं वरील विष्ठा अजून दृढ झाली.


कुष्ठरोगा पासून मुक्तता....

         एक कुष्ठरोगी ब्राह्मण गाणगापुरात सेवेत होताकुष्ठररोगा पासून मुक्तता मिळण्यासाठी दत्तगुरूंची मनोभावे सेवा करत होताएक दिवस रात्री झोपेत त्याला दत्तगुरूंचा "अक्कलकोटी जा" असा दृष्टांत झालाआज्ञेप्रमाणे ब्राह्मण अक्कलकोटी येऊन स्वामी सेवेत रुजू झाला. खूप दिवस ब्राह्मण स्वामी सेवा करत होता. कुष्ठरोगा पासून त्याला खूप त्रास होत होता, म्हणून एक दिवस व्याकुळ होऊन त्याने स्वामींकडे प्रार्थना केली की "महाराज, आता मला दुःख सहन होत नाही जर मला मृत्यू आला तर या व्याधी पासून मुक्तता मिळेल". त्याचे ते दुःख पाहून स्वामींना त्याची दया आली. समर्थांनी त्याला आज्ञा केली की "विष्ठा घेऊन अंगास लाव"! त्या ब्राह्मण भक्ताची आपल्या स्वामी समर्थांवर खूप निष्ठा होती

         स्वामी आज्ञा प्रमाण मानून त्यांना नमस्कार करून तो परत स्वामी सेवेत मग्न झाला. त्याच्या मनात आले की दुसऱ्या कोणाची विष्ठा लावण्यापेक्षा खुद्द श्री स्वामी समर्थांची विष्ठा आपल्या सर्वांगास लावावी. आणि त्याने तसे केलेही. ब्राम्हणाने स्वामी समर्थाची विष्ठा पूर्ण सर्वांगास लावली आणि थोड्यावेळाने आपले अंग स्वच्छ धुऊन घेतले. तसे तो चार-पाच दिवस करत होतात्याच्या शरीरावरचे कुष्ठ हळूहळू बरे होत होते त्याचे शरीर  दिसू लागले. तो कृष्ठरोगी  ब्राह्मण थोड्याच दिवसात बरा झाला. काही दिवस स्वामीसेवा करून त्यांची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी परतला.






जो भक्त मनोभावे निस्वार्थ गुरु सेवा करतो

त्या भक्ताच्या आराध्य देवतेचे रूप स्वामी समर्थ घेऊन त्यांची  

 इच्छा पूर्ण करतात.


टिप्पण्या