स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !!
स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !!
➤➤ ब्राह्मणाचा पोटशूळ
गेला…..
कर्नाटकातील एक श्रीधर
नावाचा ब्राम्हण पोटशूळच्या आजाराने त्रस्त होता. तो गाणगापूरात गुरु सेवेत असताना एके
रात्री दत्तगुरु त्याला दृष्टांत देतात की, "श्रीपुरी च्या पानाचा रस काढून त्यात
सुंठ आणि सैंधव घालून त्याचे सेवन कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. "श्रीधरला सकाळी
जाग आल्यावर स्वप्नाची आठवण झाली. पण श्रीपूरी कोणत्या झाडाला म्हणतात ते त्याला कळेना. काही
वैद्य आणि अनुभवी माणसांना त्याने विचारले पण कोणाला काही माहीत नव्हते. श्रीधर ब्राम्हणाला
चिंता वाटू लागली. तसाच तो गुरुसेवा आटोपून त्या रात्री देवळात झोपला. रात्री परत
स्वप्नात दत्तगुरु यतीरूपात येऊन बोलले की, "अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत. ते तुला श्री पुरीचे झाड दाखवतील."
यती राजांच्या आज्ञेप्रमाणे
श्रीधराने सकाळी अक्कलकोट चा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अक्कलकोटला जाऊन पोहोचला. त्यावेळेस विहिरीजवळील
मारुती मंदिराच्या ओट्यावर स्वामींची स्वारी बसली होती. स्वामींना नमस्कार करून श्रीधर
स्वामींच्या समोर जाऊन उभा राहिला. स्वामींनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, "अरे कडू लिंबाच्या झाडाला श्रीपुरी
म्हणतात, त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव
घालून मिश्रण करून तीन दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी दूर होईल. श्रीधर ब्राह्मणास
ते ऐकून खूप आनंद झाला. गुरु आज्ञेप्रमाणे त्याने मिश्रण करून तीन दिवस घेतले. आठ दिवसात
तो ठणठणीत बरा झाला आणि स्वामींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी परतला.
➤➤ वांझ स्त्रीस पुत्रप्राप्ती......
मंगळवेढ्यास एक साठ
वर्षाची वांझ स्त्री राहत होती. मूलबाळ नसल्याकारणाने ती खूप दुःखी होती. लोकांच्या
सततच्या बोलण्याला कंटाळली होती. ती पतिव्रता होती आणि भाविकही होती. एकदा स्वामीभक्त
बसप्पा तेल्या सोबत तिची गाठ होते. बसप्पा तेली स्वामींच्या लीला आणि चमत्कारां बद्दल
त्या स्त्रीला सांगतात. आणि तिला उपदेश करतात की, "तू स्वामींची भक्ती करत जा नित्य
दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्री कृपेकरून तुझे मनोरथ पूर्ण होईल!" त्या
स्त्रीने त्या दिवसापासून तसा नेम धरला. ती मनोभावे स्वामी स्मरण करू लागली.
जिथे स्वामी
असतील तिथे जाऊन दर्शन घेत असे आणि मग भोजन करत असे. कधी कधी स्वामी मुद्दाम दोन-दोन
दिवस तिला दर्शन देत नसत, पण त्या स्त्रीने तिचा नेम सोडला नाही. ती स्त्री तिचे व्रत
सतत दोन वर्ष करीत होती. त्या स्त्रीची धडपड आणि स्वामी भक्ती पाहून महाराज प्रसन्न
झाले, तिला म्हणाले की, "त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा म्हणजे
तुझे काम होईल!" गुरु आज्ञेप्रमाणे ती स्त्री त्या झाडाकडे गेली ते शिरसाचे झाड
होते. पांढराशुभ्र चीक झाडाला आला होता.तो काढून श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर
घालून त्या स्त्रीने सेवन केले. स्वामींच्या कृपेने स्त्री गर्भवती झाली. आणि वर्षभरात
तिला पुत्र प्राप्ती झाली....
➤➤ गाय दूध देऊ लागली....
श्री स्वामी समर्थ
हे कधी एकाच जागी स्थिर नव्हते ते सतत फिरत राहायचे. एकदा मंगळवेढ्यास असताना एका गरीब
ब्राम्हणाकडे गेले आणि दशमी खाण्यास मागितली. ब्राह्मणाला फार वाईट वाटले तो हात जोडून
समर्थांना म्हणाला की, "दरात गाय बांधली आहे,पण ती दूध देत नाही, मी तुम्हाला दशमी
कशी देऊ?" हे ऐकून महाराज गाई जवळ गेले आणि गाईच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, "बाई,
हा ब्राह्मण कुटुंबवत्सल आहे, यांस दुध देत
जा!" आणि परत ब्राम्हणाकडे आले.
ब्राह्मणाला सांगितले की, "हीचे दुध काढून
मला दशमी करून ठेव, मी संध्याकाळी परत येईन." तो ब्राम्हण समर्थांच्या बोलण्यावर
विश्वास ठेवून गाईचे दूध काढायला गेला. तो चकित झाला, गाय दूध देत होती. आज्ञेप्रमाणे त्यांनी दुधाची दशमी करुन ठेवली. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी येऊन ती
दशमी खाल्ली. पुढे त्या ब्राह्मणाची स्वामी कृपेने खूप भरभराट झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा