ब्रम्हांडनायक....श्री स्वामी समर्थांचे वर्णन.
!! श्री स्वामी समर्थ !! ब्रम्हांडनायक....श्री स्वामी समर्थांचे वर्णन खरं तर कोणा महान परमात्म्याचे वर्णन करणे हे जरा आपल्यासारख्या साधारण माणसाला कठीण जाते. कारण वर्णन हे नुसते बाह्यरूप नसते तर ते आंतर रूपी ही असते, आणि इथे तर आपण परब्रम्ह श्री सद्गुरु स्वामींचे वर्णन जाणून घेणार आहोत. स्वामी कसे होते, त्यांना काय आवडायचे, त्यांचे वागणे कसे होते, हे थोडक्यात पाहणार आहोत. स्वामी समर्थ म्हणजे तेजपुंज मूर्ती जणू, गौरवर्ण धिप्पाट शरिरयष्टी, त्यांचे खांदे रुंद असून विशाल उदर होते. त्यांची नजर खूप तीक्ष्ण होती जणू काही त्या नजरेत एकाच क्षणात भक्तांनी न बोलता मांडलेले त्यांचे प्रश्न जाणून घेत असत. पांढर्याशुभ्र भुवया, त्यांचे कान मंगलमूर्ती सारखे मोठे होते, जसे काही सर्व भक्तांचे सांगणे ऐकण्यासाठी असावेत. स्वामी फार कमी बोलत, तर कधी कधी उगाचच बडबडत असत. त्यांचे बोलणे नेहमी मराठी किंवा हिंदीत असे. हसताना पोटावर हात धरुन हसत त्यांचा तो आवाज पुऱ्या आसमंतात घुमत असे. त्यांच्या कपाळी चंदनाचा भव्य टिळा असे गळ्यात रुद्राक्षांची माळा नेहमी असायची. गुलाबांच्