!! श्री स्वामी समर्थ !!.....कर्दळी वनाचे महात्म्य



                                 !! श्री स्वामी समर्थ !!

          कर्दळी वनाचे महात्म्य

     नमस्कार मित्र , मैत्रिणींनो या अगोदरच्या लेखांमध्ये आपण हे पाहिले की स्वामी समर्थ हे सदेह केव्हा आणि कुठे प्रकटले. आजच्या लेखामध्ये मी तुमच्याशी माझ्या वाचनात आलेल्या संदर्भानुसार कर्दळी वनातून  ध्यानसाधना  समाप्त  करून स्वामी कसे प्रकटले याचा मी तुम्हाला थोडक्यात उलगडा करून सांगणार आहे.
     अत्रि  ऋषी आणि अनुसूया यांचे पुत्र म्हणजेच दत्तगुरु श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तगुरूंचा दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती त्यांनी गाणगापुरात श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केलीप्रत्येक महापुरुषाला नवा अवतार धारण करताना कोणाला ना कोणाला कारण बनवून यावे लागतेआज स्वामींच्या अवताराला कारण बनणार होता तो एक गरीब लाकूडतोडा. आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते जवळपास तीनशे वर्ष तपश्चर्या करत होते. त्यांच्याभोवती वारुळे तयार झाली वेली वाढल्या.
         एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया कर्दळीवना  मध्ये झाडावर चढून लाकडे तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड हातातून निसटून वारुळावर जाऊन पडली. त्याक्षणी वारुळातून रक्ताच्या धारा   वाहू लागल्या लाकूडतोड्या भयभीत होऊन झाडा वरून उतरला आणि वरुळा समोर जाऊन  हात जोडून उभा राहिलाआता काय अनर्थ होईल याची त्याला काळजी वाटू लागलीतो केविलवाण्या अवस्थेत वरुळकडे हात जोडून बघत होता.
     वारुळातील योगी पुरुषाची समाधी भंग पावली होती ते देह भानावर आले. क्षणातच दिव्य प्रकाश पडून त्याच्या समोर एक तेजपुंज , अजानुबाहू ,तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. हे पाहून लाकूडतोड्या भयभीत झाला. तो क्षमायाचना करू लागला. त्याची ती अवस्था पाहून स्वामींना त्याची दया आली आणि त्यांनी लाकूडतोड्याला अभयदान दिले." भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून स्वामींनी त्याला सुखी राहण्याचा आशिर्वाद दिला. आणि हेच ते श्री स्वामी समर्थ महाराज विश्वाच्या कल्याणासाठी तेथून निघाले.
     कर्दळीवनातून श्री स्वामी समर्थ श्री काशीक्षेत्री प्रकट झाले.तेथूनच गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथ पुरी मार्गाने गोदावरी तीरावर आलेश्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज शिर्डीचे श्री साईबाबा यांना दीक्षा दिली. त्यानंतर प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी  प्रकट झाले. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून . सन 1856  मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले त्यांना भोजन दिले. चोळप्पा नी भक्तिभावाने त्यांची सेवा केली बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज ,आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बीडकर महाराज हे त्यांचे शिष्य होते.


..... श्री स्वामी समर्थ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामीनिष्ठा ........!! श्री स्वामी समर्थ !!