Shree SwamiSamarth Katha - 1 ( 10 May 2020)

श्री गणेशाय नमः
         श्री स्वामी समर्थ
आज मला माझे परम पुज्य गुरुमाऊली. " श्री स्वामी समर्थ " महाराजां बद्द्दल थोडेसे लिहायला भेटते हे माझे अहोभाग्य आहे . लिखाणात काही चुका होत असतील तर श्री माउली नी मला माफ करावं .
" श्री स्वामी समर्थ" दत्तगुरु चा तिसरा अवतार . कोणी मला विचारले की देव आणि गुरू मध्ये वेगळे असे काय आहे. तर मी असे म्हणेन की देव आपले प्रारब्ध लिहितो, तर गुरु त्या प्रारब्ध मधील अडचणी दूर करून पूर्णत्वाकडे नेतो.  तहानलेल्या भक्तासाठी देवाने पाण्याने भरलेली विहीर समोर ठेवली असेल तर त्या विहिरीकडे नेऊन त्या भक्ताची तहान भागवण्याचे काम करतो तो गुरू.
   एखाद्या माणसाला शिक्षणामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकाची गरज असते. तसे प्रत्येक माणसाला आपल्या आत्म शांतीसाठी , परमशांती साठी, आणि मोक्षासाठी गुरुची गरज असते.
         "श्री स्वामी समर्थ"हे दत्ताचा अवतार पण मला उमगला तो  त्यांच्या नावाचा अर्थ असा आहे की  "स्वामी" म्हणजे की मी स्वतः ...... भक्तांचे अंतर्मन."समर्थ"... म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींवर आणि संकटांवर मात करायला तयार असणारा.
     जो भक्त स्वामी चरणी पवित्र मनाने लिन झाला आणि लोभ, मत्सर, माया या सगळ्यांना दूर लोटून स्वामी मय झाला, प्रपंचात राहून जो स्वामीचरणी लागला. त्या भक्ताच्या प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामी त्याला तारुन नेणार... पण हा! गुरु हे नेहमी सांगतात कि  चांगले कर्म, कष्ट ,आणि नामस्मरणात शिवाय काहीच शक्य नाही. श्री स्वामी समर्थ त्यालाच कृपा छाया देतात जो नेहमी चांगल्या मार्गाने कष्ट करून कर्म करतो......
श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू........




                                                                                                   Posted By... Mrs Seema Sachin Parab.






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामीनिष्ठा ........!! श्री स्वामी समर्थ !!