स्वामीलीला 2 …….!! श्री स्वामी समर्थ !!
स्वामीलीला…….!! श्री स्वामी समर्थ !! तंतुकराचे दारिद्र्य गेले..... मंगळवेढ्यास एक तंतूकार(साळी) दरिद्री माणूस राहत होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. असाच फिरत असताना एक दिवस सुदैवाने त्याची आणि स्वामींची भेट घडली. श्री समर्थांच्या कृपे बद्दल त्याला ऐकून माहीत होते. पण प्रत्यक्ष भेटी नंतर तो स्वामीमय झाला. तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला. त्याच्या त्या सेवेला तीन महिने उलटून गेले. श्रींना त्याची दया आली. एके दिवशी रात्री तंतूकाराचे स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितले की,"तुझे वडील पूर्वीमोठे व्यापारी होते पंढरपुरास यात्रेस गेले असताना ते तिकडेच मरण पावले, तुझी आई त्यांच्या अगोदरच मृत्यू पावली. तुझ्या घराच्या समोर तुळशीवृंदावना खाली तुझ्या वडिलांनी पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते तू काढून घे!" असा चमत्कारीक दृष्टांत पाहून तो तंतूकार जागा झाला. श्रींच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशीवृंदावनाच्या खाली खणल्यावर तंतुकराला भरपूर धन सापडते. तंतुकाराला अत्यानंद होतो आणि तो धावत जाऊन स्वामींना शोधू लागतो, त्याला स्वामी जंगलात ध्य